लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : येथून जवळच असलेल्या पिंप्री अवगण व पिंप्री खु येथील शेतकºयांसाठी शेती सिंचनासाठी लाभदायक ठरलेला तलाव मागील १३ वषार्पासून फुटलेल्याच परिस्थितीत पडून आहे , त्यामुळे त्या भागातील शेतकºयांना शेती सिंचनाचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे . या तलावाची दुरुस्ती यावर्षी तरी करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सन २००५ साली एकाच रात्री सदर तलाव भरुन ओव्हर फ्लो झाला होता . त्यावेळी तलावाच्या भिंतीवर असलेल्या मोठ मोठ्या वृक्षाच्या मुळा तलावाच्या भिंतीत पसरलेल्या असल्याने तलावाच्या भिंतीला मध्यभागी तडा जावून तलाव फुटले होत.े तेव्हापासून सदर तलाव आहे त्याच परिस्थितीत पडून आहे. त्या तलावाचे फुटलेले तोंड बंद करुन पुन्हा शेतकºयांसाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी वारंवार करण्यात आली , परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे . गेल्यावर्षी जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई होती. त्या पार्श्वभूमीवर यावर्षी जलयुक्त शिवार अंतर्गत कामे सुरु आहे . याच अभियानअंतर्गत या तलावाचे फुटलेले तोंड बंद करुन कोरडवाहू शेती करणाºया शेतकºयांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी होत आहे. मागील १३ वर्षात या तलावाच्या दुरुस्तीकरिता कोणीच प्रयत्न केले नाही ही बाब जिल्हा प्रशासनावर संताप व्यक्त करणारी आहे. एकीकडे लाखो रुपये खर्च करुन तलाव निमीर्ती केली जाते , परंतु दोन गावातील शेतकºयांना वरदान ठरलेल्या तलाव पुन्हा दुरुस्त करुन कोरडवाहू शेतीला सिंचनाखाली आणण्यासाठी संबधीत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. पिंप्री अवगण हे गाव टॅकरग्रस्त गाव असून या गावाचा जलयुक्त शिवार अभिमान सहभागी करुन घ्यावे अशी मागणी जोर धरु लागली आहे.
१३ वषार्पुर्वी अतिवृष्टीमुळे फुटलेल्या तलावाचा प्रश्न अंधातरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 5:21 PM