----------------
धरणावर वाढली झुडपे
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील कवठळनजीक असलेल्या धरणाच्या भिंतीवर मोठमोठी वृक्ष वाढली असून, मूळ खोलवर जाऊन धरणाच्या भिंतीला धोका उद्भवण्याची भीती आहे. ही झुडपे तोडण्याची मागणी होत आहे.
----------------
पुलावरील कठडे तुटले
वाशिम : कारंजा तालुक्यातील खेर्डा ते काजळेश्वर मार्गावरील उमा नदीवर सुमारे ४० वर्षांपूर्वी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. आता या पुलावरील सिमेंटचे संरक्षक कठडे तुटले आहेत, तर लोखंडी पाइप अज्ञात व्यक्तींनी काढून नेले आहेत. त्यामुळे येथे अपघाताची भीती आहे.
----------------
पशू लसीकरणाची प्रतीक्षा
वाशिम : पावसाळ्यात पशु वैद्यकीय दवाखान्याच्या वतीने काही भागांत गुरांना लसीकरण करण्यात येते. तथापि, कारंजा तालुक्यातील कामरगाव आणि इतर गावांत अद्यापही ही मोहीम राबविण्यास सुरुवात झाली नाही.