वाशिम : जिल्हयात शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची संख्या २ लाख ८२ हजार आहे. त्यापैकी शिधापत्रिका आधारशी जोडण्याच्या प्रक्रीयेत २७ डिसेंबरपर्यंत केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित लाभार्थ्यांच्या आधारकार्डांची पडताळणी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी बुधवारी दिली.सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी दुर करून गैरव्यवहारांवर नियंत्रण मिळविण्याकरिता शिधापत्रिका तसेच रेशन दुकाने ‘बायोमेट्रीक’ला जोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अपात्र लाभार्थ्यांच्या मुसक्या आवळल्या जाव्यात आणि गरजवंतांनाच शिधा मिळावी, हा यामागील उद्देश आहे. तथापि, सन २०१५ पासून शिधापत्रिकांना आधार क्रमांकाशी जोडण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. गत दोन वर्षांपासून राबविण्यात येत असलेली ही प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण व्हायला हवी होती. मात्र, वाशिम जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार लाभार्थींपैकी साधारणत: दीड लाखाच्या आसपास शिधापत्रिका आधारकार्डांशी लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित लाभार्थींच्या संदर्भातील हे काम अद्याप अपूर्ण असल्याचे सूत्रांनी सांगितले.शिधापत्रिका आधारकार्डांशी ‘लिंक’ करण्याचे काम युद्धस्तरावर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अनेक लाभार्थींच्या आधारकार्डांमध्ये त्रुट्या आढळल्या असून त्या निस्तरल्याशिवाय पुढची प्रक्रिया राबविता येणे अशक्य असल्यानेच या मोहिमेत काहीअंशी गतिरोधक निर्माण झाला आहे.- देवराव वानखेडेजिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम
वाशिम जिल्हयातील शिधापत्रिकांना आधारशी जोडण्याची प्रक्रीया खोळंबली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 2:05 PM
वाशिम : जिल्हयात शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची संख्या २ लाख ८२ हजार आहे. त्यापैकी शिधापत्रिका आधारशी जोडण्याच्या प्रक्रीयेत २७ डिसेंबरपर्यंत केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित लाभार्थ्यांच्या आधारकार्डांची पडताळणी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी बुधवारी दिली.
ठळक मुद्देगैरव्यवहारांवर नियंत्रण मिळविण्याकरिता शिधापत्रिका तसेच रेशन दुकाने ‘बायोमेट्रीक’ला जोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.गत दोन वर्षांपासून राबविण्यात येत असलेली ही प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण व्हायला हवी होती.वाशिम जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार लाभार्थींपैकी साधारणत: दीड लाखाच्या आसपास शिधापत्रिका आधारकार्डांशी लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.