लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत आॅनलाईन अर्ज सादर करणा-या १.२८ लाख शेतक-यांच्या पात्र, अपात्रतेची निश्चितता ठरविण्यासह वंचित शेतक-यांची यादी तयार करण्यासाठी गावपातळीवर चावडी वाचन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची गावे वगळता इतर सर्वच गावांतील चावडी वाचन आटोपत आले असून, आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ११ आॅक्टोबरपासून दुसºया टप्प्याला सुरुवात होणार आहे. शासनाने शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केल्यानंतर या योजनेसाठी शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले. यासाठी सुरुवातीला असलेली १५ सप्टेंबरपची मुदत वाढवून २२ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली. या अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील १.२८ लाख शेतकºयांचे अर्ज प्रत्यक्ष आॅनलाइन पोर्टलवर अपलोड झाले. आता यातील किती शेतकरी शासनाच्या कर्जमाफी निकषानूसार पात्र आहेत, तसेच किती शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज करूनही त्यांचे नाव यादीत आले नाही याची पडताळणी करण्यासाठी जिल्ह्यात चावडी वाचन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या चावडी वाचनाच्या पहिल्या टप्प्यात केवळ ग्रामपंचायत निवडणूक नसलेल्या गावांचाच समावेश करण्यात आला. त्यानुसार ४९२ पैकी २७३ ग्रामपंचायतीमधील गावे वगळता इतर २१९ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात ही प्रक्रिया वेगाने राबविण्यात आली. त्यामुळे या २१९ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील चावडी वाचन आटोपत आले असून, येत्या ११ आॅक्टोबनंतर ग्रामपंचायत निवडणूक झालेल्या गावांत दुसºया टप्प्यातील चावडी वाचन प्रक्रिया राबविण्यात येणार असून, येत्या १९ आॅक्टोबरपर्र्यंत शेतकºयांची यादी अद्ययावत करून त्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
कर्जमाफीच्या अर्ज पडताळणीची प्रक्रिया वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 7:56 PM
वाशिम: शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत आॅनलाईन अर्ज सादर करणाºया १.२८ लाख शेतकºयांच्या पात्र, अपात्रतेची निश्चितता ठरविण्यासह वंचित शेतकºयांची यादी तयार करण्यासाठी गावपातळीवर चावडी वाचन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची गावे वगळता इतर सर्वच गावांतील चावडी वाचन आटोपत आले असून, आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ११ आॅक्टोबरपासून दुसºया टप्प्याला सुरुवात होणार आहे.
ठळक मुद्देप्रशासनाची पराकाष्ठावंचित शेतक-यांची यादी तयार करण्यासाठी गावपातळीवर चावडी वाचन प्रक्रिया