.............
जनावरांना बिल्ले लावणे सुरु
काजळेश्वर : काजळेश्वर येथील पशुचिकित्सालयात जनावरांना बिल्ले मारुन देण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे गोपालकांनी आपले गोधन ;जनावरे पशुचिकित्सालयात आणावी असे आवाहन पशुचिकित्सक गुणवंत चतूर यांनी गोपालकांना केले आहे . जनावरांना बिल्ला असणे गरजेचे आहे त्याकरिता गोपालकांनी आपली जनावरे चिकित्सालयात आणावी असे आवाहन करण्यात आले आहे .
................
५० टक्क्यांपेक्षा जास्त बायाेगॅस प्रकल्प बंद
अनसिंग : जिल्ह्यात १९९८-१९९९ पासून २०२० पर्यंत एकूण २,१२० बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झाले. मात्र, गत काही वर्षांत गायी-म्हशींचे प्रमाण घटल्याने बायोगॅसकरता लागणारे शेण मिळणे कठीण झाल्याने ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रकल्प बंद पडले आहेत.
.................
वाहनचालकांना मार्गदर्शन
ताेंडगाव : ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाशिम-मालेगाव रस्त्यावर उभे राहून वाहनधारकांना अवजड वाहने डाव्या बाजूनेच चालवावीत, वाहन चालविताना ‘सीट बेल्ट’चा वापर करावा, मोबाईलवर संभाषण करू नये, मद्यपान किंवा कुठलीही नशा केलेली असल्यास वाहन चालवू नये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.