वाशिम: शहरातील मुस्लिम समाज बांधवांकडून ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त सोमवार(दि.२) उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. गणेश विसर्जन आणि ईद-मिलादुन्नबी एकाच दिवशी आल्याने अनेक ठिकाणी ईद-मिल्लादुन्नबी निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूक पुढे ढकलण्यात आल्या होत्या. वाशिम शहरात २ ऑक्टोबरला मिरवणुकीचा आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी ९.३० वाजता मिरवणूकीला नबीसाब मस्जीदपासून सुरूवात झाली.
बालू चौक, पाटणी चौक, रिसोड नाका, नालसाब पुरा, श्री बाकलीवाल विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सराफा गल्ली, काटीवेश, सौदागरपुरा, जुनी नगर परिषद, गणेशपेठ, बागवानपुऱ्यातील मस्जिद, बाहेती गल्ली, राजनी चौकमार्गे पुन्हा नबीसाब मस्जिदजवळ मिरवणूकीचा होता. या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते. मिरवुणकीदरम्यान वाशिम पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होतो. लहान मुलांनी आकर्षक वेषभुषा परिधान करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.