लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तूर आणि हरभºयाच्या दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. त्यात हरभºयाची खरेदी हमीभावापेक्षा २०० रुपये कमी दराने, तर तुरीचीहमीदरापेक्षा जवळपास ४०० रुपये कमी दराने व्यापाºयांकडून खरेदी होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील बाजार समित्यांत मिळून तुरीला सरासरी ५१६७ रुपये क्विंटल, तर हरभºयाला सरासरी ४२८५ रुपये प्रति क्विंटलचे दर मिळाले. जिल्ह्यात खरीप हंगामात ६९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची, तर रब्बी हंगामात ६० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात हरभºयाची पेरणी झाली. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे या दोन्ही पिकांच्या उत्पादनावर बराच परिणाम झाला. दुष्काळी स्थितीमुळे या पिकांच्या उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला. खरीपातील दीर्घकालीन पीक असलेली तूर आणि रब्बी हंगामातील हरभºयाची खरेदी आता बाजारात जोरात सुरू आहे. तथापि, या दोन्ही शेतमालाच्या दरात सतत घसरण होत आहे. शासनाने तुरीला ५६७५ रुपये प्रति क्विंटल, तर हरभºयाला ४६२० रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषीत केला असताना जिल्ह्यातील ६ बाजार समित्यांतील दराची सरासरी काढल्यानंतर तुरीची खरेदी प्रति क्ंिवटल अधिकाधिक ५१५० रुपये दराने, तर हरभºयाची खरेदी अधिकाधिक ३६०० ते ३७००ते रुपये क्विंटल दराने झाल्याचे दिसून आले. अर्थात व्यापाºयांकडून तुरीची ५०० रुपये कमी दराने, तर हरभºयाची ८०० रुपये कमी दराने खरेदी करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने पश्चिम वºहाडातील शेतकरी पिचून गेला असताना बाजार व्यवस्थेकडूनही शेतकºयाला दिलासा मिळत नसल्याने तो पुरता हताश झाला आहे.
हमीदरापेक्षा ८०० रुपये कमी दराने हरभरा खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 5:49 PM