लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मित्र, सगेसोयरे, नातेवाईकांमधील प्रेमसंबंध वृद्धींगत व्हावे, या हेतूने होळी सणाला एकमेकांना बत्ताशांची माळ देऊन रंग खेळण्याची प्रथा पुर्वापारपासून चालत आलेली आहे. ती यंदाही कायम असून साखरच्या पाकापासून बत्ताशांच्या निर्मितीस सुरूवात झालेली आहे. त्यात भोई समाजबांधव व्यस्त झाले आहेत. बत्ताशे विक्रीतून दरवर्षी जिल्ह्यातील बाजारात लाखो रुपयांची उलाढाल राहते, हे विशेष.यासंदर्भात माहिती देताना, बत्ताशे विक्रेते अनिल सोनाजी सहातोंडे यांनी सांगितले, की बत्ताशांची माळ तयार करून ती विक्री करण्याच्या व्यवसायात वाशिम येथील भोई समाजबांधव गत ६० वर्षांपासून सक्रीय आहे. होळी हा सण ८ ते १० दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर पुर्वतयारी म्हणून बत्ताशे निर्मितीचे काम सुरू करावे लागते. साखरचा पाक करून तो ठराविक साच्यात टाकून त्याचवेळी धाग्यामध्ये माळ तयार करणे हे काम तुलनेने कठीण आहे. असे असले तरी त्याचा आम्हाला दरवर्षीचा सराव असल्याने प्रक्रिया सोपी वाटते, असे सहातोंडे यांनी सांगितले.गत काही वर्षांत साखरचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने बत्ताशे निर्मितीचा खर्च वाढला असून विक्रीच्या दरातही नाईलाजास्तव वाढ झाली आहे; मात्र विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांकडून बत्ताशांच्या खरेदीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. त्यामुळे या व्यवसायातून बºयापैकी मिळकत होत असल्याचेही अनिल सहातोंडे यांनी सांगितले.
साखरच्या पाकापासून पारंपरिक पद्धतीने बत्ताशांची निर्मिती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 6:12 PM