कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे अनेक छोटे-मोठ्या व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांना भेडसावत असल्याचे चित्र आहे. मार्च महिना संपला. एप्रिल महिन्याला प्रारंभ झाला आहे. यावेळी शैक्षणिक सत्र अंतिम टप्प्यात असते, परंतु कोविड संसर्गामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थीवर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता पालकांना त्रस्त करीत आहे. त्यातच लग्नसराईचे दिवस असतानाही सद्यस्थितीत कोरोना संसर्गामुळे लग्नसमारंभ रद्द करण्याची वेळ वधू-वरांच्या पालकांवर येवून ठेपल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे लग्नसमारंभाचे महत्त्वपूर्ण घटक असलेल्या व्यवसायिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. यामध्ये विशेषतः लग्न समारंभात मंडप व वाजंत्री व्यवसायिकांचा व्यवसाय जवळजवळ ठप्प झाल्याने छायाचित्रे काढण्यासाठी वापरण्यात येणारी महागडी उपकरणे सध्यातरी शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
व्यावसायिक आर्थिक संकटात, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:43 AM