जिल्ह्यात सतत वाढत असलेल्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात संसर्गाला प्रतिबंध लावण्याकरिता शहरात लॉकडाऊनचे कडक पालन करण्यात येत आहे. तसेच सदर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता शहरातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे तसेच शहरातील सर्व आस्थापना व प्रतिष्ठानधारकांकरिता तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी आयोजित केलेल्या विशेष कॅम्पमध्ये आस्थापनाधारकांनी नेमून दिलेल्या भागानुसार तसेच तपासणी राहिलेल्यांनी नगर परिषद कार्यालय सभागृहामध्ये तपासणीकरिता हजर राहावे. त्यानंतर त्यांनी तपासणी प्रमाणपत्र घ्यावे अन्यथा तपासणी न केल्यास प्रतिष्ठान उघडता येणार नाही. ज्यामुळे प्रतिबंध लावता येईल व प्रादुर्भाव वाढणार नाही याकरिता सर्व आस्थापनाधारकांनी तपासणी करून घ्यावी. तसेच याबाबत ग्रामीण रुग्णालय येथेदेखील तपासणी सुविधा सतत उपलब्ध आहे. याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी नीलेश गायकवाड़ यांनी केले आहे.
कोविड तपासणीकरिता व्यावसायिकांनी सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:42 AM