या कालावधीत शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे, वाद्य वाजविणे, किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, पत्ते खेळणे आणि तशी चिन्हे, चित्रे, फलक किंवा कोणत्याही जिन्नस, वस्तू तयार करणे किंवा त्याचा लोकांमध्ये प्रसार, प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.
अंत्ययात्रा, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी यांना हा आदेश लागू राहणार नाही.
००००००
विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेमणुका
पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात परिस्थितीनुसार योग्य कारण असेल व तसे करण्याशिवाय पर्याय नसेल तर अशा परिस्थितीत याबाबत कोणताही आदेश नजीकच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी विचार विनिमय करून आदेश लागू करण्यास उपविभागीय दंडाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, तसेच आवश्यकता वाटल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांनी संवेदनशील ठिकाणी विशेष कार्यकारी अधिकारी, दंडाधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात, असे जिल्हा दंडाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.