- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील बगिच्यांना, नगर परिषद कार्यक्षेत्रातील झाडांना देण्यासाठी नगरपालिका शहरातून गोळा करीत असलेल्या कचºयातून स्वत: कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रकल्प वाशिम नगरपरिषदेच्यावतिने हाती घेण्यात आला होता. शहरातील विविध भागात कंपोस्ट टाक्या (पिट) लावण्यातही आले होते, परंतु सद्यस्थितीत या टाक्यांची तूटफूट झाली असल्याचे दिसून येत आहे.वाशिम नगरपरिषदेच्यावतिने शहरातील विविध भागात लावलेले कंपोस्ट टाक्या (पिट) यामधून दरमहा ६ ते ७ टन खताची निर्मिती होणार होती. सदर खत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णयही नगर परिषदेने घेतला होता,परंतु प्रभावी अंमलबजावणीअभावी असे काहीच होवू शकले नाही.वाशिम शहरात दररोज सकाळी व संध्याकाळी घंटागाडयांव्दारे ओला व सुक्या कचºयाचे संकलन केल्या जाते. ओल्या कचºयापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला होता व प्रत्यक्षात कामास सुरुवात ही करण्यात आली. होती. यासाठी शहरातील काही भागात ३ बाय १२ आकाराचे १० कंपोस्ट खत आर्टिफिशियल कंपोस्ट पिट (टाक्या) तयार करण्यात आल्या होत्या. यामध्ये कंपोस्ट खत तयार करण्यास सुरुवात ही करण्यात आली होती. काही दिवसच ते व्यवस्थित झाले त्यानंतर याकडे कुणीही लक्ष दिले नसल्याने हा प्रकल्प नावापुरताच राहिला.सद्य: स्थितीत नगर पालिकेतर्फे तयार करण्यात आलेले आर्टिफिशीयल कंपोस्ट पिटाची तूटफूट झाली असून त्याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. शहरातील डंम्पींग गार्डनवर कायमस्वरुपी पीट तयार करण्याच्या कामास सुरुवात करुन कंपोस्ट खत तयार होणार होते; परंतु शहरातील विविध भागात तयार करण्यात आलेले पिट आज दिसेनासे झाले आहेत तर जे आहेत, त्याची तूटफूट झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या देखरेखीखाली हे कंपोस्ट खत नियोजनबध्द तयार करण्यात येणार होते; मात्र मध्यंतरी वाशिम नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांची बदली झाल्यानंतर कायमस्वरूपी मुख्याधिकारी न मिळणे यासह अन्य स्वरूपातील अडचणींमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.
शेतकºयांना खत मिळालेच नाहीवाशिम शहरातील ओल्या कचºयापासून निर्माण होणाºया खताचे प्रमाण जास्त असल्याने सदर खत ज्या शेतकºयांना लागेल त्यांना अल्पदरात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला होता परंतु नियोजनाअभावी ते कोणालाही मिळू शकले नाही. मोठा गाजावाजा करत नगरपरिषद प्रशासनाने या प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शेटे यांची बदली होईपर्यंत तो व्यवस्थितरित्या चालला त्यानंतर मात्र याकडे कुणीही फिरकून पाहिले नाही.
एका चांगल्या उद्देशाने कंपोस्ट खत निर्मितीकरिता वाशिम शहरात विविध ठिकाणी कंपोस्ट टाक्या (पिट) लावण्यात आल्या आहेत. मध्यंतरी काही तांत्रीक अडचणींमुळे या कामास निश्चितपणे ‘ब्रेक’ लागला. असे असले तरी लवकरच हा उपक्रम पुन्हा एकवेळ पूर्ण ताकदीने राबविण्यात येईल.- अशोक हेडानगराध्यक्ष, वाशिम