लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यातील शेतकरीवर्गात बंजारा बांधवांची संख्या लक्षणीय आहे. या बंजारा शेतकरी बांधवांना केंद्र शासनाच्या शेतकरी मानधन योजनेची माहिती व्हावी, या योजनेचे महत्व त्यांना कळून याचा फायदा त्यांनी घ्यावा, या ऊद्देशाने वाशिम जिल्ह्यातील मानोराचे तालुका कृषी अधिकारी बंजारा बोलीतून बंजारा बहुल भागांत शेतकरी मानधन योजनेचा प्रचार करीत आहेत. यासाठी त्यांनी स्वत:ची ध्वनीचित्रफीतही (व्हिडीओ) तयार केली असून, राज्याचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांनी या ऊपक्रमाची प्रशंसा केली आहे. हा व्हिडीओ राज्यभरात व्हायरलही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तालुका कृषी अधिकारी बंजारा समाजाचे नसतानाही त्यांनी वाशिम जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेवरून हा प्रयोग केला आहे.केंद्रशासनाच्यावतीने शेतकºयांना पेन्शनस्वरुपात रक्कम देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेंतर्गत १८ ते ४० वर्षे वयापर्यंतचे आणि दोन हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेले शेतकरी पात्र ठरणार असून, या शेतकºयांना वयाच्या ६० वर्षांपर्यंत ५५ ते २०० रुपये अंशदायी रक्कम जमा करावी लागणार आहे. शेतकºयांनी जमा केलेल्या रकमेएवढीच रक्कम शासनाकडून जमा करण्यात येणार असून, लाभार्थी शेतकºयांना ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ३ हजार रुपये मासिक निवृत्ती वेतन दिले जाणार आहे. १८ ते ४० वर्षे वयापर्यंतच्या शेतकºयांना या योजनेत वयानुसार वेगवेगळी रक्कम प्रति महिना भरावी लागणार आहे. प्रत्येक समाजातील शेतकºयाला या योजनेची माहिती मिळावी म्हणून प्रशासन प्रयत्न करीत आहे. वाशिम जिल्ह्यासह राज्यात बंजारा समाजात शेतकºयांची संख्या लक्षणीय आहे. ही बाब विचारात घेऊन वाशिमचे जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी मानोरा तालुक्यातील बंजारा समाजातील शेतकºयांना बंजारा बोलीत या योजनेविषयी मार्गदर्शन करण्याचे ठरविले. त्यांनी मानोराचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली. तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांची बोली मराठी आहे; परंतु ग्रामीण भागांत वास्तव्य आणि बंजारा बांधवांशी जवळीक असल्याने त्यांना बंजारा भाषेत संवाद साधता येतो. जिल्हाधिकाºयांची संकल्पना व्यापकपणे आणि कमी वेळेत यशस्वी करण्यासाठी सचिन कांबळे यांनी एका शेतात जाऊन शेतकºयांना बंजारा बोलीत मार्गदर्शन करतानाच व्हिडिओ तयार करून घेतला. हा व्हिडिओ जिल्हाधिकाºयांकडे पाठविला जिल्हाधिकाºयांनी हा व्हिडिओ राज्याचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांच्याकडे पाठविला. त्यांनी या उपक्र माची प्रशंसा केली असून, हा व्हिडिओ आता राज्यभरात फिरविला जात आहे.
बंजारा बोलीतून शेतकरी मानधन योजनेचा प्रचार; राज्यभरात व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 4:25 PM