कारंजा शहरात सध्या जमीन अकृषकबाबत मोठ्या प्रमाणात भूमाफियांचा गैरप्रकार सुरू असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. करोडो रुपये किमतीच्या जमिनीच्या वापरात विनापरवानगी बदल केल्याप्रकरणी सात व्यक्तीविरुद्ध दंडात्मक कारवाई केली होती. दंडाची रक्कम भरण्याबाबत संबंधितांना सूचनाही देण्यात आल्या; मात्र याकडे काहींनी कानाडोळा केला तर काही जणांनी दंड भरला. दरम्यान, प्रीती तेजस चवरे यांनी बागायत सर्व्हे नंबर ४१ मधील जमीन विनापरवानगी अकृषक वापर केला होता. याप्रकरणी २८ लाख ३७ हजार ५९२ रुपये दंड ठोठावण्यात आला होता. भरणा पावतीवर खरेदी-विक्री केलेल्या प्रकरणात झालेल्या या दंडाच्या रकमेचा भरणा न केल्यामुळे त्यांच्या घरी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनात मालमत्ता जप्तीची कारवाई ८ मार्च रोजी महसूल विभागाच्या पथकाने केली. या कारवाईमुळे कारंजा शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. महसूल विभागाकडून करण्यात आली.
दंड न भरल्यामुळे मालमत्ता जप्तीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:45 AM