वाशिम, दि. १२- नगर परिषदेच्या वतीने कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली असून १४ मार्चपासून मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी दिली.थकीत व चालू कराचा भरणा करावा यासाठी विविध क्लृप्त्या लढवूनही अनेकांनी कराचा भरणा न केल्याने , तसेच सुटीच्या दिवशीही कर भरणा करण्याची व्यवस्था केल्यानंतरही ज्या थकबाकीदारांनी कराचा भरणा केला नाही त्यांच्या थकीत रकमेच्या किमतीचा माल व जंगम मत्ता अटकवून ठेवण्याकरिता कर निरीक्षक अ. अजीज अ. सत्तार यांचे पथक नेमण्यात आले आहे. अटकवून ठेवलेल्या, जप्त केलेल्या मालमत्तेचा सर्व तपशील प्रमाणित करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी दिली.
उद्यापासून मालमत्ता जप्तीची कारवाई!
By admin | Published: March 13, 2017 2:13 AM