वाशिम : सोनल मध्यम प्रकल्प कालव्याच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत शासनाला सादर करावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ६ फेब्रुवारीला दिल्या होत्या. त्यानुसार सध्या जलसंपदा विभागातर्फे पुढील कार्यवाही केली जात आहे.
सोनल मध्यम प्रकल्पाच्या पाण्याचे वितरण योग्यरितीने होऊन त्या पाण्याचा सिंचनासाठी वापर होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत शासनाला सादर करावा, पुढील कार्यवाही केली जाईल, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या होत्या. या सूचनांच्या अनुषंगाने जलसंपदा विभागातर्फे पुढील कार्यवाही केली जात आहे. कालव्याची दुरूस्ती झाल्यास पाण्याचे वितरण योग्यरितीने होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.