शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘नाफेड’च्या तूर खरेदीसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव!

By admin | Published: February 28, 2017 1:41 AM

केंद्र शासनाला पत्र; शेतक-यांना दिलासा!

दादाराव गायकवाडवाशिम, दि. २७- जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकर्‍यांना आधार व्हावा, या उद्देशाने नाफेडच्या तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार नाफेडकडून सुरू असलेली तुरीची खरेदी १५ मार्चऐवजी १५ एप्रिलपर्यंंत सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती नाफेडसाठी तूर खरेदी करणार्‍या महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांनी शनिवारी दिली. जिल्ह्यासह राज्यभरात काही ठिकाणी नाफेडची तूर खरेदी करण्यात येत आहे. विविध तांत्रिक अडचणींमुळे ही खरेदी संथ झाली असताना आता येत्या १५ मार्चनंतर ती बंदही करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची बाजारात मोठय़ा प्रमाणात पिळवणूक होण्याची शक्यता आहे. नाफेडसाठी जिल्ह्यात विदर्भ मार्केटिंग फेडरेशन (व्हीसीएमएफ) च्यावतीने मंगरुळपीर येथे, तर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (एमएससीएमएफ) च्यावतीने मालेगाव, कारंजा, वाशिम, अनसिंग या चार ठिकाणी तूर खरेदी सुरू करण्यात आली. त्यातील मालेगाव आणि अनसिंगसह कारंजा येथील खरेदी साठवणुकीच्या अडचणीपोटी बंद करण्यात आली, तर वाशिम येथे साठवणुकीच्या अडचणीमुळेच संथ गतीने खरेदी करण्यात येत आहे. खरेदी केलेल्या तुरीच्या साठवणुकीसाठी ह्यएमएससीएमएफह्ण च्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. यासाठी पणन महामंडळाच्या गोदामांसह स्वत:ची गोदामे वापरण्याची तयारी त्यांनी केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळालाही सूचना देऊन साठवणुकीसाठी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. तथापि, नाफेडच्या खरेदीची मुदत ही १५ मार्च ठेवण्यात आली आहे. त्यातच साठवणुकीच्या अडथळय़ामुळे खरेदी बंद ठेवण्यात आल्याने अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. इतर शेतकर्‍यांना त्याचा फटका बसू नये म्हणून राज्य शासनाकडून नाफेडच्या खरेदीसाठी १५ एप्रिलपर्यंंंत मुदतवाढ मिळावी, यासाठी एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत त्यावर सकारात्मक निर्णय होणार असल्याचा विश्‍वास जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांनी वर्तविला आहे. केवळ वाशिम जिल्हाच नव्हे, तर राज्यातील इतरही जिल्ह्यात नाफेडसाठी धान्य खरेदी सुरू आहे. येत्या १५ मार्चपर्यंंतच या खरेदीची मुदत ठरविण्यात आली आहे; परंतु शेतकर्‍यांच्या सोयीसाठी ही मुदत महिनाभरासाठी वाढविण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला आहे. मंगळवारपर्यंंंत यावर सकारात्मक निर्णय होण्याचा विश्‍वास आहे. मुदतवाढ मिळाल्यास साठवणूक व्यवस्था करून खरेदी सुरू ठेवण्यात येईल.-एम. व्ही. बाजपेयीजिल्हा मार्केटिंग अधिकारी वाशिम