लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागातील महिला व युवतींना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ पुरविण्याच्या उद्देशाने ८ मार्च २०१८ पासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘अस्मिता’ योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत विद्यार्थिनींना ‘सॅनिटरी नॅपकिन’चा पुरवठा करण्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून जवळपास ६ लाख रुपयांची तरतूद केली जाणार असून, तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे.‘अस्मिता’ योजनेमुळे तळागाळातील युवती व महिलांपर्यंत त्यांच्या मासिक पाळीदरम्यान आरोग्याची काळजी घेण्याबद्दल जागृती होईल तसेच या कारणामुळे शाळांमधील विद्यार्थीनींचे महिन्यातून ठराविक चार ते पाच दिवस गैरहजर राहण्याचे प्रमाण घटेल, हा उद्देश बाळगण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शासनाने महिला बचतगटांवर सोपविण्याचा निर्णय घेतला होता. यामाध्यमातून बाजारपेठेत तुलनेने महाग असलेली ‘सॅनिटरी नॅपकिन’ केवळ पाच रुपयांमध्ये ग्रामीण भागातील गोरगरिब कुटूंबातील गरजू युवती व महिलांना दिली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिला बचतगटांनाही रोजगार मिळेल आणि महिला व मुलींच्या आरोग्याचा प्रश्नही निकाली निघेल, असा दुहेरी फायदा साध्य होणार आहे. या महत्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी मध्यंतरी झाली नाही. ‘सॅनिटरी नॅपकिन’साठी जिल्हा परिषदेकडूनही निधीची तरतूद व्हावी याकरिता नाविण्यपूर्ण योजनेतून निधीला मंजूरी मिळावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव सादर केला आहे. निधी प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर प्राप्त निधीतून ‘सॅनिटरी नॅपकिन’ची खरेदी केल्यानंतर विद्यार्थिनींना ‘सॅनिटरी नॅपकिन’चे वितरण केले जाणार आहे.
‘सॅनिटरी नॅपकिन’साठी नाविण्यपूर्ण योजनेतून निधीची तरतूद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:45 PM
वाशिम : ग्रामीण भागातील महिला व युवतींना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ पुरविण्याच्या उद्देशाने ८ मार्च २०१८ पासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘अस्मिता’ योजना सुरू करण्यात आली.
ठळक मुद्दे विद्यार्थिनींना ‘सॅनिटरी नॅपकिन’चा पुरवठा करण्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून जवळपास ६ लाख रुपयांची तरतूद केली जाणार.या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शासनाने महिला बचतगटांवर सोपविण्याचा निर्णय घेतला होता. प्राप्त निधीतून ‘सॅनिटरी नॅपकिन’ची खरेदी केल्यानंतर विद्यार्थिनींना ‘सॅनिटरी नॅपकिन’चे वितरण केले जाणार आहे.