शेतकºयांना लाभ: विविध योजनांची अमलबजावणीलोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- कडधान्य कार्यक्रमाची प्रभावी अमलबजावणी करण्याच्या उद्देशाने शासनाकडून वाशिम जिल्ह्यासाठी विविध प्रवर्ग निहाय ७ कोटी ५७ लाख ९५ हजार ८००, रुपयांची सुधारीत तरतूद करण्यात आली आहे. यामुळे वाशिम जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यास मदत होऊन शेतकºयांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे. कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान -कडधान्य कार्यक्रम राज्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकºयांना विविध बाबींचा शासन निर्धारित प्रमाणानुसार अनुदान देण्यात येते. यात पीक प्रात्यक्षीक, कृषी अवजारे, मोटारपंप, गोदाम आदिंचा समावेश आहे. या अभियानासाठी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी शासनाने ५२ कोटी ४६ लाख २२ हजार ७०० रुपयांची तरतूद केली आहे. यात वाशिम जिल्ह्यासाठी ७ कोटी ५७ लाख ९५ हजार ८०० रुपयांच्या निधीचा समावेश आहे. या निधीतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा- कडधान्य अभियानांतर्गत शेतकºयांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान -कडधान्य कार्यक्रमांतर्गत मंजूर निधीतून शेतकºयांसाठी योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत शेतकºयांना शासन निर्धारित निकषानुसार अनुदान प्राप्त होणार आहे. -दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीवाशिम