वाशिम : ‘प्रधानमंत्री कृषी सिंचाई’ योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सूक्ष्म सिंचन योजनेकरिता वाशिम जिल्ह्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केलेली असतानाही कृषी विभागाला केवळ अडीच कोटी रुपयेच प्राप्त झाले आहेत. उर्वरित अनुदान लवकरच प्राप्त न झाल्यास जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा एकू ण ११ हजार ३७६ शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज सादर केले. त्यात ठिबकसाठी १ हजार ९५२; तर तुषार संचाकरिता ९ हजार ४२४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाने जिल्ह्यासाठी सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गतठिबक आणि तुषार सिंचनासाठी १० कोटी २ लाख रुपयांची तरतूद केली आहे. आतापर्यंत केवळ २ कोटी ६१ लाख रुपये आॅनलाइन प्राप्त झाले असून, अनुदानाच्या आधारे शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)
तरतूद १० कोटींची, मिळाले केवळ अडीच कोटी
By admin | Published: October 14, 2016 2:46 AM