शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

वाशिम जिल्ह्यात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’संदर्भात जनजागृती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:31 PM

वाशिम : स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागातर्फे जनजागृती सुरू असून, घरांवर स्टिकर लावले जात आहेत. सोबतच ‘कन्यारत्न’ जन्मताच जिल्हा प्रशासनातर्फे माता-पित्यांचे अभिनंदन केले जात आहे.

ठळक मुद्देस्त्री जन्माचे स्वागतघरावर लावले जाताहेत स्टिकर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागातर्फे जनजागृती सुरू असून, घरांवर स्टिकर लावले जात आहेत. सोबतच ‘कन्यारत्न’ जन्मताच जिल्हा प्रशासनातर्फे माता-पित्यांचे अभिनंदन केले जात आहे.विविध कारणांमुळे स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरात तफावत निर्माण होत आहे. यातूनच स्त्री भ्रूण हत्या, लिंग निवड चाचणी आदी प्रकार घडत असल्याने यावर प्रभावी उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान २१ फेब्रुवारी २०१५ पासून देशातील १०० जिल्ह्यांत सुरू असून, यासाठी १०० टक्के निधीची हमी केंद्र शासनाने घेतली आहे. या अभियानात महाराष्ट्रातील बुलडाणा, वाशिम, बीड, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना यासह १६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. या अभियानात समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यात लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षिततेबाबत खात्री देणे, स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे यासह अन्य उद्दिष्ट साध्य करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवण्यात आले. या अभियानांतर्गत  वाशिम जिल्ह्यात जनजागृती म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण विभागाने जनजागृती सुरू केली आहे. घरांवर स्टिकर लावणे, कन्यारत्न प्राप्त होताच माता-पित्यांचे अभिनंदन करणे, मुलींच्या शिक्षणाबद्दल पालकांना माहिती देणे आदी उपक्रम राबविले जात आहेत. यापुढेही बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानांतर्गत जनजागृतीपर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी जिल्हा समन्वयक रुपेश निमके यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा प्रशासन, बालविकास प्रकल्प अधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे.