लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : माता, बालमृत्यू रोखण्यासाठी, सुरक्षित प्रसूतीचा प्रयत्न म्हणून राज्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ९ डिसेंबरपासून अंमलात आणली आहे. या योजनेंतर्गंत रुग्णालयात नोंदणी व प्रसुती झालेल्या महिलांना तीन टप्प्यात पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी म्हणून वाशिम जिल्ह्यात जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.माता व बालमृत्युदरातील वाढ हा चिंतेचा विषय बनला आहे. माता व बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी, महिलांची प्रसूती सरकारी रुग्णालयांत व्हावी, माता व बालकांची प्रकृती सुदृढ राहावी या उद्देशाने केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने यावषीर्पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली. केंद्र व राज्य शासनाच्या सहभागाने राबविण्यात येणाºया या योजनेंतर्गत महिलांची प्रसुती रुग्णालय किंवा वैद्यकीय अधिकाºयांच्या देखरेखखाली व्हावी हा प्रमुख उद्देश आहे. गर्भवती महिलांची नोंदणी, त्यांना प्रसूतीपूर्व व प्रसुतीनंतर आरोग्य सोयी सुविधा देऊन नवजात बालकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची असल्याने या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाने आरोग्य विभागावर सोपविली आहे. सदर योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून, पहिल्या जिवीत अपत्यापूरतीच मयार्दीत आहे. सदर लाभ एकदाच घेता येणार आहे. नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ एकदाच मिळणार आहे. या योजनेत दारिर्द्यरेषेखालील तसेच दारिर्द्यरेषेवरील लाभार्थींचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाºया महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. लाभाची रक्कम मिळण्यासाठी संबंधित गर्भवती महिलेला शासनाने अधिसूचित केलेल्या रुग्णालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलेस एकूण तीन टप्प्यात पाच हजार रुपयांचा लाभ आधार संलग्नित बँक खात्यात जमा केला जाणार आहे. मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसाच्या आत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता एक हजार रुपये तसेच किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास, गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसºया हप्ता २ हजार रुपये लाभार्थी महिलेच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटॅटीस बी वा त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला डोज दिल्यानंतर तिसºया हप्त्याची २ हजार रुपये रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. लाभार्थी महिलेची शासकीय रुग्णालयात प्रसुती झाल्यास त्यांना जननी सुरक्षा योजनेंतर्गत ७०० रुपये (ग्रामीण भाग) व ६०० रुपये (शहरी भाग) लाभ पूर्वीप्रमाणेच मिळणार आहे. दरम्यान, या योजनेची माहिती ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागातर्फे आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसंदर्भात जनजागृती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 1:01 PM
माता, बालमृत्यू रोखण्यासाठी, सुरक्षित प्रसूतीचा प्रयत्न म्हणून राज्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ९ डिसेंबरपासून अंमलात आणली आहे. या योजनेची अंमलबजावणी म्हणून वाशिम जिल्ह्यात जनजागृती केली जाणार आहे,
ठळक मुद्देरुग्णालयांतील प्रसूती वाढविण्याचा प्रयत्न५ हजार रुपये मिळणार