लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील ग्राम भट उमरा येथील स्वामी विवेकानंद युवा मंडळाने शासनाच्या स्वच्छभारत अभियानाला हातभार लावत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवारी शौचालय बांधून त्याचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात केली. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद मंडळामार्फत गावात विविध उपक्रम नेहमीच राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून ज्यांच्याकडे शौचालय नाही. त्यांच्या घरावर लाल रंगाचे स्टिकर लावून. त्यांना शौचालयाचे महत्व पटून देण्यात आले. व शासनाच्या वतीने देण्यात येणाºया १२ हजार रुपयाच्या आनुदानाविषयी माहिती देण्यात आली.पुढील काळात गावातील कुणीही उघड्यावर शौचास जाऊ नये यासाठी पथकाची निर्मिती करण्यात येणार आहे. या अभियानात युवा मंडळाचे सुरेश राजाराम काळे, गणेश काळे, काशिराम काळे, आनंद काळे, देवानंद इंगोले, दिपाली इंगोले, गणेश उमाळे, महादेव काळे, महेश काळे, गणेश भारत काळे,सुनील काळे, राजू काळे, शुभम काळे, गजानन ठाकरे, ज्ञानेश्वर वसुदेव काळे यांनी सहभाग घेतला. स्वामी विवेकानंद युवा मंडळाच्या या उपक्रमामुळे गावकरीही शौचालय बांधण्यासाठी प्रेरित झाले आणि त्यांनी याबाबत ग्रामपंचायतमार्फ त अर्ज सादर करण्याची तयारीही दर्शविली आहे.
नेहरू युवा केंद्राच्या युवा मंडळाकडून शौचालयाबाबत जनजागृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 7:09 PM
वाशिम तालुक्यातील ग्राम भट उमरा येथील स्वामी विवेकानंद युवा मंडळाने शासनाच्या स्वच्छभारत अभियानाला हातभार लावत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवारी शौचालय बांधून त्याचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात केली.
ठळक मुद्देशासनाच्या अभियानाला हातभारगावक-यांना पटविले स्वच्छतेचे महत्त्व