वाशिम : १ ते ७ जुलै या कालावधीत जिल्ह्यात ५ लाख ८ हजार वृक्षांची लागवड केली जाणार असून, यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने जनजागृतीच्या मोहिमेला गती दिली आहे.जिल्ह्यातील अधिकाधिक क्षेत्रफळ वनराईखाली आणण्यासाठी प्रत्येक विभागाला वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच ग्रामपंचायती हद्दितील इ-क्लास जमिनीवरही वृक्षारोपण केले जाणार आहे. त्या दृष्टिने खड्डे खोदण्यात येत आहेत. ग्रामपंचायतीकडे असलेल्या ई- क्लास जमिनीवर बर्याचदा शेतीसाठी व इतर कारणांसाठी अतिक्रमण झालेले असते. या जमिनीतील वृक्षतोडीमुळे गावातील गायरान नष्ट झाले आहे. या जमिनीवर पुन्हा नव्याने वृक्ष लागवड केल्यास पर्यावरणाचे रक्षण होईल आणि गायरान तयार झाल्यामुळे गावातील जनावरांना चारा उपलब्ध होईल.अतिक्रमण झालेल्या सर्व जमिनी ग्रामपंचायतने वृक्ष लागवडीसाठी ताब्यात घेऊन त्यामध्ये खड्डे खोदून ठेवण्याच्या सुचना यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही केली जात असून, १ जुलै ते ७ जुलैदरम्यान या जमिनीवर वृक्ष लागवड सप्ताह राबविला जाणार आहे. वाशिम जिल्ह्याला ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या अनुषंगाने ५ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावपातळीवर चित्ररथ फिरविण्याला सुरूवात केली आहे. २५ जूनपयर्ंत हा चित्ररथ ग्रामीण भागामध्ये जाऊन कलापथकाच्या माध्यमातून झाडांचे महत्त्व पटवून देणार आहे.
वृक्षसंवर्धनासाठी प्रशासनाची जनजागृती मोहिम !
By admin | Published: June 18, 2017 7:20 PM