लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर (वाशिम) : सिनेअभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे मंगरुळपीर तालुक्यातील बहुतांश गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी संमती दर्शविली आहे. त्यानुसार या गावांमध्ये चित्रफितीद्वारे जलसंधारणाच्या कामांसंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. पाणी फाउंडेशनतर्फे गावोगावी जलसंधारणाची कामे व्हावी याकरीता ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले जात आहे. वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी गावांत जलसंधारणाची कामे कशा प्रकारे करावी यासह अन्य विषयांसंदर्भात गावकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक समाधान वानखडे, अतुल तायडे, सामाजिक प्रशिक्षक दीपमाला तायडे, मयुरी काकड़, तांत्रिक प्रशिक्षक कल्याणी वडस्कर, निलेश भोयर यांनी गावोगावी जनजागृतीची मोहिम हाती घेतली आहे. तालुक्यातील चकवा, घोटा , मजलापुर, तपोवन, जनुना बू, गिंभा, पोघात, पिंर्पी खु , चेहल , चिंचाळा, मानोली , पिंप्रि अवगण , बोरव्हा बू , लखमापुर, सार्सी , नादगांव, अरक, निंबी, रामगड, गणेशपूर, उमरी येथे गावसभा, ग्रामसभा घेऊन गावकº्यांना प्रोजेक्टरव्दारे माहिती दिली जात आहे. दुष्काळातुन समृद्धिकड़े, चला हवा येऊ द्या, तुफान आल या, झाले गेले ते विसरून सारे गावाचा विकास करायचे आदीे चित्रफीत दाखवून मंगरुळपीर तालुक्यातील जनजागृती केली जात आहे. ज्या गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग निश्चित केलेला आहे, त्या गावाला जलचळवळमधे सहभागी होण्याचे आवाहन चमूद्वारे केले जात आहे. सर्वांना वॉटर कप स्पर्धेविषयी माहिती व चार दिवसाचे निवासी ‘जलसंधारण ते मनसंधारण’ या प्रशिक्षणाला गावपातळीवरचे सरपंच, ग्रामरोजगार सेवक, सेवानिवृत शिक्षक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ता, दोन महिला जे अंगनवाडी सेविका, मदतनिस, बचत गटाच्या महिला कोणी प्रशिक्षणासाठी येऊ इच्छित असेल तर त्यांचीही निवड प्रशिक्षणासाठी करता येणार आहे, असे मान्यवरांनी सांगितले. दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदर गावातील सरपंच, सचिव, ग्राम पंचायत कर्मचारी, गावातील जलमित्रांची मदत होत असल्याचे सांगून तालुक्यात व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे., असे तालुका समन्वयक वानखडे यांनी सांगितले. पाणी फाऊंडेशनच्यावतीने चार दिवशीय निवासी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले असल्याने वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी होऊन यांमध्ये जलसंधारण व मनसंधारण करून गाव पाणीदार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन वानखडे व चमूने केले आहे.
मंगरूळपीर तालुक्यात चित्रफितीद्वारे ‘जलसंधारणा’ची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 3:44 PM