लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : श्रावणमासात बेलवृक्षांची होत असलेली कटाई पाहता येथील राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग ईको क्लबच्या चिमुकल्यांच्यावतिने ते थांबविण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. वाशिम येथील राष्ट्रीय हरीतसेना , एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाव्दारे पहिल्या श्रावण सोमवारपासूनच लाखाळा परिसरात प्रसिद्ध असलेल्या कोडेंश्वर संस्थान परिसरात राष्ट्रीय हरीतसेना व निसर्ग ईकोक्लबच्यावतीने बेलवृक्षाचे वृक्षारोपण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात बेलवृक्ष विस्मृतीत जात आहे . सोबतच श्रावण महिण्यात बेलांच्या पानांची व वृक्षांची होणारी तोड व ºहास थांबविण्याच्या दृष्टिकोनातुन जनजागृती व्हावी या अनुशंगाने हा उपक्रम राबिविण्यात येत आहे.औषधी उपयुक्त बेलवृक्षाचे संवर्धन होवून पर्यावरण संतुलन राखले जावे हाही दृष्टिकोन या उपक्रमामागे आहे. सदर उपक्रम शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येत आहे .यासाठी राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी बेलवृक्षाच्या लागवडीचा व संवर्धनाचा संदेश चिमुकल्यांना सोबत घेवून देत आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमात परिसरातील नागरीकांना सहभागी करुन घेतल्या जात आहे. यासाठी निसर्ग ईकोक्लबचे चिमुकले स्नेहल लांडकर ,नूतन देशमुख ,भूमी गवई,प्रिया मुंढे , रिझा हुसेन , भावना इंगळे, अनुष्का जोशी ,रेनुका जांगीड , दिशा अग्रवाल , आरती वाझुळकर , वेदश्री देशमाने ,दुर्गश घनोकार ,करण तिवारी ,साहिल राउत ,सोहम पाठक ,मोहन गायकवाड व कोडेंश्वरसंस्थानाचे विश्वस्त सचिव माधवराव गाढवे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
श्रावण मासात बेलवृक्षांची कटाई थांबविण्यासाठी चिमुकल्याची जनजागृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:09 PM
वाशिम : श्रावणमासात बेलवृक्षांची होत असलेली कटाई पाहता येथील राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग ईको क्लबच्या चिमुकल्यांच्यावतिने ते थांबविण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
ठळक मुद्दे राष्ट्रीय हरीतसेना व निसर्ग ईकोक्लबच्यावतीने बेलवृक्षाचे वृक्षारोपण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. औषधी उपयुक्त बेलवृक्षाचे संवर्धन होवून पर्यावरण संतुलन राखले जावे हाही दृष्टिकोन या उपक्रमामागे आहे.