वाशिम : २ ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधी यांची जयंती म्हणून साजरी केली जाते तसेच कुष्ठरोग दिन म्हणूनही पाळला जातो. महात्मा गांधीजींचे अपूर्ण राहिलेले कार्य म्हणजे कुष्ठरोग निर्मूलन. म्हणून गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधून शासनामार्फत २ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान जनजागृती व १९ ऑक्टोबर ते ३0 ऑक्टोबर दरम्यान सर्वेक्षण अशा प्रकारे कुष्ठरोगविषयी उपक्रम चालवला जाते. कुष्ठरोगाबद्दल लोकांच्या मनातील भीती व गैरसमज दूर करण्यासाठी, लवकरात लवकर नवीन रुग्ण शोधण्यासाठी आणि त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी कुष्ठरोग हा इतर आजारांसारखा रोगजंतूंमुळे होणारा आजार आहे. कुष्ठरोग हा आनुवांशिक नाही व त्याचा संसर्ग फार कमी आहे. पहिल्या एकाच मात्रेने त्याचा संसर्ग नाहीसा होतो. समाजातील सर्व कुष्ठरोग्यांना त्वरित उपचाराखाली आणल्यास कुष्ठरोगाचे दूरीकरण सहजशक्य होऊ शकते. कुष्ठरोग निर्मूलनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, सहायक संचालक आरोग्य सेवा (वाशिम) यांच्यावतीने कुष्ठरोग तंत्रज्ञ के.एस. कर्हाडे यांनी केले आहे.
कुष्ठरोग निर्मूलनासाठी शासनामार्फत जनजागृती
By admin | Published: October 02, 2015 2:12 AM