‘आत्मा’अंतर्गत लोहसहभागीय सूक्ष्म नियोजन कार्यक्रमात ‘पूर्वतयारी कार्यशाळा’ घेण्यासह या उपक्रमाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागाने गावात प्रभात फेरी काढली जात आहे, तसेच प्रौढ व वयस्कर व्यक्तींबरोबर चर्चा करून गावासंबंधी ऋतुचक्र, समायरेषा व परिस्थिती विश्लेषण माहिती घेऊन चर्चा करण्यात येत आहे. कारंजा तालुक्यातील वाघोळा येथे सोमवारपासून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी
सकाळी प्रकल्प व सूक्ष्म नियोजन प्रक्रियेबद्दल जनजागृती होण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर गावातील लोकांनी संपूर्ण गावातील संसाधनांचा ‘संसाधन नकाशा’ काढण्यात आला. यात समूह साहाय्यक ज्ञानेश्वर दराडे यांनी नकाशा वाचन केले व गावातील प्रौढ व वयस्कर व्यक्तींबरोबर चर्चा करून गावासंबंधी ऋतुचक्र व परिस्थिती विश्लेषणाची माहिती घेऊन चर्चा करण्यात आली. नंतर गावकऱ्यांबरोबर शिवार फेरी व विहीर निरीक्षण करण्यात आले. या प्रसंगी कृषी पर्यवेक्षक संतोष मिसाळ, कृषी साहाय्यक मंगेश सोळंके, समूह साहाय्यक ज्ञानेश्वर दराडे, गावचे सरपंच भारत भगत, स्वयंसेवक चेतन राऊत व कुलदीप ठाकरे तसेच ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा प्रकल्प कक्ष वाशिम व सूक्ष्म नियोजन समन्वयक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
===Photopath===
090221\09wsm_1_09022021_35.jpg
===Caption===
आत्मा अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्मनियोजन कार्यक्रम