----
गावांच्या मुख्य रस्त्यांवर उकिरडे
वाशिम : जिल्ह्यात ग्रामीण परिसरात रस्त्यावरच उकिरडे तयार झाले आहेत. या उकिरड्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हे उकिरडे साफ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
----
पावसामुळे पाणंद रस्ते चिखलमय
वाशिम : जिल्ह्यातील पांगरी नवघरेसह इतर अनेक गावांतील जुन्या पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पावसामुळे या रस्त्यांवर चिखल झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात साहित्य नेण्यात अडचणी येत आहेत.
--------------
इंझोरीत येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : खरीप हंगामातील पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर इंझोरीसह परिसरातील काही गावांत कृषी विभागामार्फत कीड नियंत्रण आणि तणव्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
-------------------
तलाठ्यांचे शहरातून अपडाऊन सुरूच
वाशिम : जिल्ह्यातील अनेक तलाठ्यांना कामकाज पाहण्यासाठी कार्यालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना शहरी भागातून अपडाऊन करावे लागत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून काही जण सुटीवर असल्याने शेतकरी व ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
--------------
आसेगावात पोलिसांची संख्या अपुरी
वाशिम : आसेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत ५२ पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. या गावांतील जनतेच्या सुरक्षेसाठी मात्र आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी नाहीत. त्यामुळे कार्यरत पोलिसांवर कायदा- सुव्यवस्था अबाधित राखताना ताण येत आहे.
-------------
नाल्यांत घाण, गावांत अस्वच्छता
वाशिम : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील मान्सूनपूर्व कामे करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे नाल्या खच्च भरल्या असून, सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने आरोग्याला धोका आहे. ग्रामपंचायतीने मान्सूनपूर्व कामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी केली.
^^^^
जडवाहनांमुळे ग्रामीण रस्त्याची दैना
वाशिम : कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागांतील विविध रस्त्यांवरून समृद्धी महामार्गाच्या कामासाठी गौणखनिज नेणारी जडवाहने सतत धावत असल्याने या रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.