0000
रस्त्यावर पुन्हा फेरीवाले
वाशिम : वाशिम शहरातील रस्त्यावर उभे राहून फेरीवाले हे मालाची विक्री करीत असल्याचे शनिवारी दिसून आले. मध्यंतरी रस्त्यावर फेरीवाले राहत नव्हते. आता पुन्हा फेरीवाले हे रस्त्यावर, रस्त्यालगत उभे राहत असल्यााचे दिसून येते.
०००००
रोहयोची कामे सुरू करा
वाशिम : शेतीचा हंगाम संपल्यामुळे रोजगारासाठी रोजगार हमी योजनेंंतर्गत कामे उपलब्ध होणे आवश्यक आहे. पोहरादेवी परिसरात रोहयोची कामे ठप्प असल्याने शेतमजुरांची चिंता वाढली आहे. रोजगार मिळावा याकरिता रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
०००
मांगूळझनक येथे आणखी चार रुग्ण
वाशिम : रिसोड तालुक्यातील मांगूळझनक येथे आणखी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले असून, कोरोनाबाधित रुग्णांना कोविड केअर सेंटर येथे हलविण्यात आले आहे.
०००
सौर पंप योजनेतून मेडशीला डच्चू
वाशिम : सिंचनासाठी सौरपंपाची जोड मिळावी याकरिता कृषी सौरपंप योजना राबविण्यात येत आहे. काही तांत्रिक कारणामुळे यावर्षी या योजनेत मालेगाव तालुक्याचा समावेश झाला नाही. त्यामुळे या योजनेपासून मेडशी परिसरातील शेतकरी वंचित राहत आहेत.
००००००
ब्लिचिंग पावडरचा अनियमित वापर
वाशिम : उंबर्डाबाजार परिसरातील काही ग्रामपंचायती जलकुंभात ब्लिचिंग पावडरचा वापर नियमित करीत नसल्याचे दिसून येते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दूषित पाणीपुरवठा होऊ नये म्हणून पाण्यात ब्लिचिंग पावडरचा नियमित वापर करणे गरजेचे आहे.
०००००
वाकद येथे आरोग्य तपासणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील वाकद येथील ११जणांचा कोरोना चाचणी अहवाल १७ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी केली आहे. एकाच दिवशी ११ कोरोना रुग्ण आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात आरोग्य विभागाचा चमू सर्वेक्षण करीत असून, नागरिकांनीदेखील खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.