लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून आता चेहºयावर मास्क, रुमाल न लावता शहरात फिरणाºया नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी १३ एप्रिल रोजी दिल्यानंतर १४ एप्रिलपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. पहिल्याच दिवशी पाटणी चौकस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी ५ जणांवर तर इतरही चौकामध्ये कारवाईस प्रारंभ करण्यात आला.साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाशिम जिल्ह्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून वाशिम जिल्ह्यात मास्क, रुमाल न लावता शहरात सार्वजनिक ठिकाणी फिरणाºया नागरिकांकडून एकरकमी २०० रुपये दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.तसेच एकाच नागरिकावर एकापेक्षा जास्त वेळा दंडाची रक्कम आकारण्यात आल्यास, अशा नागरिकाला शहरामध्ये फिरण्यास मज्जाव करून कलम १८८ अन्वये कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मोडक यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. काही ठिकाणी मास्क नसणाºयांना पकडल्यानंतर त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांना उठबशा काढून रुमाल बांधण्यात सांगण्यात आले. ज्यांच्याकडे रुमालही नव्हते अशांना अंगातील शर्ट काढून त्याचे मास्क करण्यास पोलीस विभागाने भाग पाडले.नगरपरिषदेची मास्क न वापरणाºयांना पावती४मास्क न वापरणाºयांवर कारवाईची मोहीम पोलीस विभागाच्यावतिने हाती घेण्यात आली असून नियमांचे पालन न करणाºयांना नगरपरिषदेची पावती पोलीस विभागाकडून देण्यात येत आहे. वाशिम शहरातील पाटणी चौकातील पोलीस कर्मचारी दिलीप जाधव यांना मास्क न वापरणाºयांवर किती जणांवर कारवाई करण्यात आली यावर कारवाईस प्रारंभ करण्यात आला असून ५ वाजेपर्यंत ४ जणांवर कारवाई केल्याचे सांगितले. तसेच आदेशानंतर पहिलाच दिवस असल्याने पोलीस कर्मचाºयांच्यावतिने नागरिकांना सूचना देऊन नियमांचे पालन करण्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर नागरिकांनी या विषाणुचे गांभीर्य समजून घेऊन घरातच राहणे आवश्यक आहे. तरी अत्यावश्यक काम असल्यास सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. मास्कचा वापर न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या आदेशनुसार कारवाईची मोहीम सुरु झाली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.- दीपक मोरेमुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम
कोरोना विषाणु संसर्गजन्य असल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने शहरात फिरत असतांना मास्क वापरणे गरजेचे आहे. शक्यतोवर काम नसतांना घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक काम आहेच तर बाहेर पडतांना मास्क वापरावा. जो कोणी मास्क वापरताना दिसणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे.-वसंत परदेसीपोलीस अधीक्षक , वाशिम