गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका झपाट्याने वाढत असून संसर्गावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासनाने आठवडी बाजार भरविण्यास मनाई केली आहे. असे असताना काही व्यावसायिक नियम डावलून आठवडी बाजारच्या दिवशी दुकाने लावत आहेत. त्याची प्रशासनाने दखल घेऊन आठवडी बाजार भरणार नाही, त्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतच्या सचिवांकडे सोपविली. त्यानुसार शेलूबाजार येथे बुधवारी आठवडी बाजार न भरविण्याच्या सूचना ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून देण्यात आल्या; मात्र बाजार भरलाच. त्यामुळे अखेर आज बाजारातील दुकानदारांवर सचिव सीमा सुर्वे यांनी दंडात्मक कारवाई केली व आठवडी बाजार भरण्यापासून मज्जाव केला. यावेळी सचिव सीमा सुर्वे यांच्यासह लिपिक विष्णू सुरसे, कर्मचारी रोशन गावंडे, गौतम गवई, गणेश सुरसे, अमोल दुबे, पोलीस कर्मचारी अनिरुद्ध भगत, गोपाल कव्हर, अंकुश मस्के, महल्ले उपस्थित होते.
आठवडी बाजार भरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:19 AM