शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

७ हजारांपैकी केवळ १२६१ शेतकऱ्यांच्या उडिदाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 6:03 PM

वाशिम: जिल्ह्यात यंदा दोन महिन्यांपासून उडिद, मुगाच्या शासकीय खरेदीला सुरुवात करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदा दोन महिन्यांपासून उडिद, मुगाच्या शासकीय खरेदीला सुरुवात करण्यात आली. या खरेदी प्रक्रियेसाठी ७०३८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली असली तरी, चालू आठवड्यापर्यंत केवळ जिल्ह्यातील सहा केंद्रांवर मिळून केवळ १२६१ शेतकºयांच्या उडिदाची खरेदी होऊ शकली आहे. त्यामुळे या खरेदी प्रक्रियेला वेग देण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी, त्यात नियमितता नव्हती. त्यातच आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर शेतमाल खरेदीत उडिद आणि मुगाला अपेक्षीत भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश झाले होते. शासनाने मुगाला ६९७५ रुपये प्रति क्विंटल, तर उडिदाला ५६०० रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केले असतानाही बाजारात उडिदाला प्रति क्विंटल ४८००, तर मुगाला प्रति क्विंटल ५००० रुपयांपर्यंत दर मिळत असल्यामुळेच शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकºयांकडून सुरू होती. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. तत्पूर्वी ३१ आॅक्टोबरपर्यंतच्या मुदतीत जिल्ह्यातील ७०२४ शेतकºयांनी उडिदाच्या विक्रीसाठी खरेदी विक्र ी संस्थांकडे नोंदणी केली होती. यात मंगरुळपीर आणि कारंजा येथे व्हीसीएमएसच्या खरेदी प्रक्रियेंतर्गत अनुक्रमे ३४८१ आणि १५०५ शेतकºयांनी नोंदणी केली होती, तर जिल्हा पणन अधिकारी कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या खरेदी प्रकियेत रिसोड तालुक्यातील १२०. मानोरा तालुक्यातील ५१५ आणि मालेगाव तालुक्यातील ११९५ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ १२६१ शेतकºयांच्या ७४३८ क्विंटल उडिदाची खरेदी पाच केंद्रावर झाली आहे. अद्यापही ५७७७ शेतकºयांच्या उडिदाची मोजणी शिल्लक आहे. थंडीच्या दिवसांत या शेतकºयांना रोज आपल्या मालाची मोजणी करून घेण्यासाठी खरेदी केंद्रांकडे वाºया कराव्या लागत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती