यावेळी सरपंच शे. जमीर शे. गणीभाई, धीरज मंत्री, ज्ञानेश्वर मुंडे, मुलचंद चव्हाण, रमजान गवारे, संजय भागवत आदी पदाधिकारी उपस्थित होते. पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठराविक महत्त्वाच्या ठिकाणी सीसी कॅमेरे लावणे, पिण्याचे थंड पाणी, बैठक व्यवस्था आदी कामे करण्याचा सपाटा लावला आहे. दरम्यान, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून भरीव निधीची तरतूद करण्यासंबंधी चर्चा करण्याकरिता ग्रा.पं. शिष्टमंडळाने ६ मार्च रोजी खासदार गवळी यांची भेट घेतली. यावेळी शासनाकडून निधी खेचून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही गवळी यांनी दिल्याची माहिती सरपंच शेख जमीर यांनी दिली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख उद्धवराव गोडे, रिसोडचे महिला बालकल्याण विकास सभापती सुभाष चोपडे व शेख जामिरभाई मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मेडशीच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:38 AM