लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सध्या शेतकरी नानाविध संकटातून जात असून, वाढते वीज भारनियमन त्यात अधिकच भर घालत आहे. शेतकºयांना दिलासा म्हणून वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा यासह अन्य प्रलंबित समस्या निकाली काढण्याची मागणी भारिप-बमसंच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आली आहे. अनेक ठिकाणी परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची सुधारित हंगामी पैसेवारी वस्तुस्थितीला धरून काढणे अपेक्षीत आहे. शेतकºयांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाºया विद्यमान सरकारकडून शेतकºयांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे, असा आरोप भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी निवेदनाद्वारे केला. शेतमालाला समाधानकारक हमीभाव नाही, कर्जमाफी ही तांत्रिक बाबीत अडकत आहे, प्रलंबित कृषीपंप जोडणीचा प्रश्न निकाली निघाला नाही, गतवर्षीचे शेतमालाचे चुकारे अद्याप मिळालेले नाहीत, अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. परिसरात भारनियमनाव्यतिरिक्त वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. एकंदरीत शेतकºयांची अवस्था बिकट असून, शेतकºयांना दिलासा म्हणून शासनाने शेतकºयांच्या व्यथा जाणाव्या, शेतकºयांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढावे, वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव तथा जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी निवेदनाद्वारे दिला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भारिप-बमसं आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 2:16 PM