पांगरी नवघरे गावानजीक असलेला लहान पुलांची उंची फार कमी असल्यामुळे दोन्ही धरणांच्या पाण्याचा संगम या पुलाजवळ होत असल्यामुळे वरच्या धरणावरून पावसाचे अति प्रमाण झाल्यास या पुलावरून पाणी वाहते. नुकत्याच झालेल्या पावसामुळे चार वाजता पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. मालेगाववरून पांगरीकडे येणारे तसेच पांगरी नवघरेकडून मालेगावकडे जाणारे तसेच आजूबाजूच्या खेड्यांचे जवळपास ८० ते ९. ग्रामस्थांना पाणी ओसरुन जायेपर्यंत तेथेच थांबावे लागले. काही नागरिक मात्र जीव मुठीत घेऊन त्या पाण्यातून प्रवास केला. संबंधित प्रशासनाला तसेच विद्यमान लोकप्रतिनिधींना गेल्या पाच वर्षांपासून पुलांची उंची वाढवण्यासाठी वारंवार विनंती केली जात आहे; मात्र पुलाच्या उंचीचा प्रश्न सुटता सुटेना. तत्काळ या पुलाला एक तर कठड्याची व्यवस्था करून पुलावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करून या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
पाच वर्षांपासून पुलाचा उंची प्रश्न प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:27 AM