- दादाराव गायकवाड वाशिम : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात तीन वर्षांत १२ हजार ६४० कामे प्रस्तावित असताना कोट्यवधी रुपये खर्चून ११ हजार ३६ कामे करण्यात आली; परंतु या कामाचा फारसा फायदा झाला नसून, वॉटर न्यूट्रल झालेल्या गावांतही पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे ‘जलयुक्त‘च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.आखतवाड्यात आदर्शजलयुक्त शिवार अभियानांतर्गत कारंजा तालुक्यातील आखतवाडा येथे २०१५-१६ मध्ये सिमेंट नालाबांधाचे काम करण्यात आले. एकूण १२० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेल्या या कामामुळे २.३६ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध होऊन ४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले, तसेच विहिरींच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली. या कामाचा मोठा फायदा सिंचनासाठी झाल्याचे मत आखतवाडा येथील शेतकरी सहदेव आठवे यांनी व्यक्त केले.मंगरुळपीर तालुक्यात जलयुक्तची अनेक कामे अर्धवट आहेत, तर काही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला नाहीच, शिवाय शासनाच्या निधीचाही अपव्यय झाला. कृषी विभागाने ही कामे पुन्हा करावी, अशी आमची मागणी आहे- गणेश पवार, शेतकरीजलयुक्त शिवार अभियानांतर्गत कारंजातील भामदेवी शिवारात ११.२१ हेक्टरवर सलग समतल चर खोदलने वाहून जाणारे पाणी चरामध्ये मुरले आणि या शिवारातील शेत स. नं. ४९५ मधील माझ्या मालकीच्या १.२५ हे. आर. जमिनीती विहिरीच्या पातळीत मोठी वाढ झाली.
- संजय ढवक, शेतकरी