वाशिम : विना अनुदानित शाळेवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय देयकाचा प्रश्न अद्यापही निकाली निघाला नाही. यामुळे पश्चिम वºहाडातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.गत काही वर्षात शिक्षण क्षेत्रात विविध निर्णय घेतले जात आहेत. काही निर्णय फायद्याचे तर काही निर्णय शिक्षण संस्था व कर्मचाºयांसाठी घातक ठरत असल्याचा आरोप शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी संघटनांनी केला आहे. टीईटी संदर्भातील निर्णयामुळे राज्यातील अनेक शिक्षकांवर नोकरीची टांगती तलवार लटकून आहे. सन २००५ पूर्वी विनाअनुदानित शाळेवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी म्हणून रूजू झाल्यानंतरही या कर्मचाºयांना जूनी पेन्शन योजना लागू नाही. याबरोबरच विना अनुदानित शाळेवर कार्यरत शिक्षक, शिक्षक कर्मचाºयांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक अद्यापही लागू नाही. त्यामुळे हा एकप्रकारे या कर्मचाºयांवर अन्याय असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अमरावती विभागीय शिक्षक संघाने लढा उभारला आहे. अगोदरच विना अनुदानित शाळेवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच त्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकही मिळत नसल्याने या अडचणीत भर पडली आहे. गत दोन वर्षात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील जवळपास ३२०० कर्मचाºयांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकापासून मुकावे लागले आहे. विनाअनुदानित शाळेवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मिळत नसल्याने या कर्मचाºयांवर मोठा अन्याय आहे. हा प्रश्न निकाली निघावा, याकरीता अमरावती विभागीय शिक्षक संघाने लढा उभारला आहे.- अॅड. किरण सरनाईकअध्यक्ष, अमरावती विभागीय शिक्षक संघ विनाअनुदानित शाळेवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मिळत नाही. त्यामुळे त्यांचे प्रस्ताव प्रलंबित राहण्याचा प्रश्नच नाही.- आकाश आहाळेप्रभारी उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, वाशिम
विनाअनुदानित शाळेवरील कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय देयकाचा प्रश्न जैसे थे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 3:14 PM