मोप आरोग्य केंद्राला मिळाले स्ट्रेचर
रिसोड : केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या निधीतून तालुक्यातील मोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला स्ट्रेचर वाटप करण्यात आले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अमोल नरवाडे यांनी मागणी केली होती. यामुळे रुग्णांची साेय झाली.
मधुमक्षिका पालन करण्याचे आवाहन
वाशिम : मधुमक्षिका पालन व्यवसायातून दारिद्र्यरेषेखालील महिलांना आत्मनिर्भर करण्याचा उद्देश बाळगण्यात आला आहे. त्यामुळे मधुमक्षिका पालनाकडे वळावे, असे असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.
लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन
वाशिम : १० वर्षांआतील मुलांनादेखील कोरोना संसर्ग होण्याचा धोका असून, पालकांनी लहान मुलांना जपावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. आपल्यापासून पाल्याला कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
संरक्षण भिंतीसाठी निधीची प्रतीक्षा
वाशिम : रिठद गावालगत पूरसंरक्षण भिंत उभारण्यासाठी शासनाकडून निधी मिळण्यासंदर्भात तालुका प्रशासनामार्फत सामाजिक कार्यकर्ते नारायण आरू यांनी वारंवार मागणी केली. अद्यापही निधी मिळाला नसल्याने काम रखडले.
वीज बिलामुळे सामान्य ग्राहक त्रस्त
वाशिम : महावितरण कंपनीकडून वारंवार वीज दरवाढ, अतिरिक्त शुल्क तर कधी अतिरिक्त सुरक्षा रकमेची देयके पाठविली जात आहेत. या कारभाराने त्रस्त वीज ग्राहकांमध्ये असंतोष पसरला असून कंपनीविरुद्ध राेष व्यक्त करीत आहेत.