शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
4
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
5
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
6
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
7
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
9
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
10
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
11
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
12
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
13
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
14
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
15
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
16
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
17
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
18
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
19
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
20
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील

पीककर्जाचा भरणा करण्यासाठी बँकांसमोर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:20 AM

पीककर्जाचा भरणा करण्यासाठी तसेच अन्य बँकिंग कामासाठी ३० मार्च रोजी बँकांसमोर नागरिकांच्या रांगा दिसून आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले. संचारबंदी लागू असल्याने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात आहे. तथापि, पीककर्जाचा भरणा करण्यासाठी तसेच अन्य बँकिंग कामासाठी ३० मार्च रोजी बँकांसमोर नागरिकांच्या रांगा दिसून आल्या.जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही संशयित अथवा बाधित रुग्ण आढळलेला नाही. तथापि, सावधगिरीचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे शासन आदेशाची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. संचारबंदी आदेश लागू असल्याने जमाव करण्यास मनाई आहे. वाशिम शहरात संचारबंदी आदेशाचीही कठोर अंमलबजावणी सुरू आहे.परंतू, पीककर्जाचा भरणा करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च असल्याने आणि त्यानंतर पीककर्जाचा भरणा केल्यास व्याजाचा भुर्दंड बसणार असल्याने पीककर्जाचा भरणा करण्यासाठी बँकांसमोर नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र ३० मार्च रोजी वाशिम शहरासह ग्रामीण भागात दिसून आले. अत्यावश्यक सेवेच्या दुकानांजवळ विशिष्ट अंतरावर वर्तुळ रंगविले असून, तेथे नागरिकांना उभे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाशिम शहरातील बहुतांश बँकांसमोर विशिष्ट अंतरावर वर्तुळ रंगविण्यात आले नाही. त्यामुळे एका मागोमाग एक असे नागरीक उभे असल्याचे ३० मार्च रोजी दिसून आले. कोरोना विषाणूचा संसर्ग हा एकापासून दुसऱ्याला होत असल्यामुळे नागरिकांनीदेखील स्वत:हून काळजी घेऊन गर्दी होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. परंतू, काही नागरिक याबाबत गंभीर नसल्याचे बँकांसमोरील व बँकांमधील गर्दीवरून दिसून येते. दरम्यान बँकांमध्ये गर्दी होणार नाही, याची खबरदारी म्हणून ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमाची बँकांमध्ये अंमलबजावणी होणे आवश्यक ठरत आहे.

रिसोड येथे ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नियम अंमलबजावणी नाहीरिसोड : पीककर्जाचा भरणा करण्यासाठी रिसोड येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत ३० मार्च रोजी शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली होती. बँकेत कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता नागरिकांची गर्दी झाल्याने ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे केले जात आहे. तथापि पीककर्जाचा भरणा करण्याची मुदत जवळ आल्याने आणि मागील दोन दिवस बँका बंद असल्याने ३० मार्च रोजी बँकांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले.

मेडशी येथे शेतकºयांची गर्दीमेडशी : येथील दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेमध्ये चालू पीक कर्ज भरण्यासाठी ३० मार्च रोजी श्ेतकºयांची एकच गर्दी झाली होती. शासनाने थकीत शेतकºयांसाठी कर्जमुक्ती योजना तर चालू कर्जदारांना प्रोत्साहन देण्यासाठीा चालू कर्ज भरणे बंधनकारक आहे. सध्या कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. परंतू, पीककर्जाचा भरणा केला नाही तर व्याजाचा भुर्दंड बसेल आणि प्रोत्साहनपर लाभही मिळणार नाही, या भीतीपोटी कोरोना विषाणू संसर्गाच्या आपत्कालिन परिस्थितीतही मेडशी येथे पीककर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकºयांनी जिवाची पर्वा न करता ३० मार्च रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर गर्दी केली होती. बँकेसमोर विशिष्ट अंतरावर वर्तुळ रंगविले असून, या वर्तुळात शेतकरी उभे राहून नियमाचे पालन करीत असल्याचेही दिसून आले. कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी गजानन टाले यांनी यावेळी बंदोबस्त ठेवला. मेडशी येथील २६३ शेतकरी, खैरखेळा १३४, वारंगी ३४, पांगराबंदी १०१, सुदी ६४, भौरद ४०, राजुरा १०६, देवठाणा खांब ७९, ब्राम्हणवडा १५७, मारसुळ १४०, अशाप्रकारे १११७ चालू कर्जदार शेतकरी आहेत.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक