लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): शेतात वीजजोडणीसाठी महाविरणकडे पाच वर्षांपूर्वी कोटेशनची रक्कम भरूनही तालुक्यातील अनेक शेतकर्यांना वीज जोडणी मिळाली नाही. याची प्रकाराची दखल संबंधित शेतकर्यांना त्वरीत वीज जोडणी न दिल्यास शेतकर्यांसह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी तहसीलदार राजेश वझिरे यांना निवेदनाव्दारे दिला आहे. मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी कृषीपंपाकरिता वीज जोडणी मिळावी म्हणून महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाकडे रितसर अर्ज सादर करून कोटेशन भरले आहे; परंतु पाच वर्षे उलटली तरी, या शेतकर्यांना अद्यापही वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे शेतकºयांना सिंचनापासून वंचित राहावे लागल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकरी वीज जोडणीसाठी वारंवार महावितरण कार्यालयाच्या वा-याकरून गलित गात्र झाले असतानाही त्याची दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या समस्येबाबत शेतकरी संघटनेने आक्र मक पावित्रा घेतला आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटेनेच जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी मालेगावच्या तहसीलदारांकडे शेतकर्यांसह निवेदन सादर करून महावितरणच्या मालेगाव उपविभागाने येत्या आठवडा भरातकोटेशन भरलेल्या शेतकर्यांची वीज जोडणी द्यावी, अन्यथा सर्वच संबंधित शेतकºयांसह उपोषण करण्यात येईल,असा इशारा दिला आहे. दरम्यान, पांगरा बंदीचे शेतकरी दत्तराव पर्वतराव घुगे यांना केवळ ३८ युनिट वापराच्या देयकापोटी तब्बल ३ हजार ५१० रुपये आकारणी कशी झाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
कोटेशन भरलेल्या शेतकर्यांना पाच वर्षांपासून वीज जोडणीची प्रतिक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:57 PM
अनेक शेतकर्यांना वीज जोडणी मिळाली नाही. याची प्रकाराची दखल संबंधित शेतकर्यांना त्वरीत वीज जोडणी न दिल्यास शेतकर्यांसह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी तहसीलदार राजेश वझिरे यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
ठळक मुद्देमालेगाव तालुक्यातील प्रकारशेतकरी संघटनेचा उपोषणाचा इशारा