शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

वाशिममध्ये रब्बी पीकविम्याचे प्रमाण १७ टक्क्यांवर!

By admin | Published: January 07, 2017 7:44 PM

नोटाबंदीनंतर पिकविमा घेणाºया शेतकºयांचे प्रमाण घसरून केवळ १७ टक्क्यांवर आले आहे

सुनील काकडे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ७ -  ऐन रब्बी हंगामाच्या सुरूवातीला ८ नोव्हेंबर रोजी चलनातून ५०० आणि हजारच्या नोटा बंद झाल्या. त्यामुळे खरिपातील शेतमाल विक्रीतून चालणा-या रोखीच्या व्यवहारांवर टाच बसल्याने शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटली. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीचा पेरा १४ हजार ६०० हेक्टरने वाढला असला तरी कर्ज घेणाºया शेतकºयांचे प्रमाण मात्र ५,८०० ने घटले असून पिकविमा घेणाºया शेतकºयांचे प्रमाणही केवळ १७ टक्क्यांवर आले आहे. 
 
जिल्ह्यातील कर्जदार शेतकºयांना त्यांनी पेरलेल्या पिकांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकºयांसाठी ऐच्छिक आहे.  तथापि, गतवर्षी जिल्ह्यातील ६ हजार ९९५ शेतकºयांनी रब्बी हंगामात ४३ कोटी ५४ लाख रुपये कर्जाची उचल केली होती. ते सर्व शेतकरी प्रधानमंत्री पिकविमा योजनेकरिता आपसूकच पात्र ठरले होते. चालूवर्षी मात्र कर्जाची उचल करणाºया शेतकºयांचे प्रमाण आजमितीस केवळ १ हजार १९३ असून तेवढ्याच शेतकºयांचा थेट प्रधानमंत्री पिकविमा योजनेत समावेश झाला आहे. त्याव्यतिरिक्त इतर कुठल्याच शेतकºयाने अद्यापपर्यंत पिकविमा योजनेत सहभाग नोंदविला नसल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.
 
मुदतवाढीनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’
 
रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि करडई या पिकांकरिता लागू असलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता पूर्वी ३१ डिसेंबर ही अंतीम मुदत होती. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकºयांना पीक विम्याचा हप्ता बँकेत जमा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने विहित मुदतीत या योजनेस शेतकºयांमधून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शासनाने योजनेस १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याऊपरही जिल्ह्यातील सुमारे ८५ टक्के शेतकºयांनी अद्याप विमा योजनेत सहभाग नोंदविलेला नाही. 
 
 
चलनातून ५०० आणि हजारच्या जुन्या नोटा रद्द ठरविण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला जाहीर झाला. त्यानंतर सर्वच बँकांवर कामाचा अतिरिक्त ताण आल्याने शेतकरी पीककर्ज वाटप प्रक्रियेसह पीकविमा हप्ता भरण्याच्या प्रक्रियेस बहुतांशी खीळ बसली. त्यामुळेच ही स्थिती उद्भवली आहे.
व्ही.एच.नगराळे, व्यवस्थापक, अग्रणी बँक, वाशिम