शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

वाशिममध्ये साडे नऊ हजार शेतकºयांना रब्बी पिक विमा

By admin | Published: March 20, 2017 1:36 PM

जिल्ह्यातील १० हजार ७३ पैकी ९ हजार ४९० शेतकरी भरपाईस पात्र ठरले असून, त्यांच्याकरिता एकूण ६ कोटी २३ लाख ९७ हजार ५४९ रूपये मंजूर

वाशिम: गतवर्षी अर्थात २०१५-१६ मध्ये रब्बी हंगामात राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत, राज्यातील २६ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ८३ लाख रुपयांची नुकसान भरपाई बुधवार, १ मार्च रोजी मंजूर झाली आहे. ज्यामध्ये हरभरा, उन्हाळी भुईमूग व गहु या अधिसूचित पिकांकरिता जिल्ह्यातील १० हजार ७३ पैकी ९ हजार ४९० शेतकरी भरपाईस पात्र ठरले असून, त्यांच्याकरिता एकूण ६ कोटी २३ लाख ९७ हजार ५४९ रूपये मंजूर झाल्याची माहितीे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून शुक्रवारी प्राप्त झाली़रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी (बागायत व जिरायत), करडई, सूर्यफूल, गहू (बागायत व जिरायत), कांदा, उन्हाळी भुईमूग व उन्हाळी भात ही आठ पिके अधिसूचित करण्यात आली होती. यापैकी हरभरा व गहु पिक घेणाऱ्या मालेगाव तालुक्यातील अनुक्रमे ७२६ व ३९९ या प्रमाणे १,१२२ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग घेतला होता़ योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी २९ लाख ५० हजार ४५५ रूपये, तर गहु पिकासाठी ४२ लाख ५९ हजार ९७५ रूपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ तसेच मंगरूळपीर तालुक्यातील एकूण १२०० शेतकऱ्यांनी हरभरा व ४५१ शेतकऱ्यांनी गहु पिकाचा विमा उतरविला होता़ या तालुक्यातील शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी १२ लाख ७२ हजार ६५४ रूपये, तर गहु पिकासाठी १ लाख ९२३ रूपयाची भरपाइ मंजूर झाली आहे़ मानोरा तालुक्यातील एकूण २४८ शेतकऱ्यांनी हरभरा तर ४६२ शेतकऱ्यांनी गहु पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते़ त्यांना हरभरा पिकापोटी ८ लाख ७२ हजार ७१६ रूपये, तर गहु पिकासाठी १० लाख ९५ हजार २४० रूपयाची नुकसान भरपाई मिळणार आहे़ रिसोड तालुक्यातील एकूण ३३८५ शेतकऱ्यांनी हरभरा व ६८८ शेतकऱ्यांनी गहू पिकासाठी विम्याचे सुरक्षा कवच घेतले होते़ त्यातील हरभरा पिकापोटी ३ कोटी ३६ लाख ४८ हजार ३५०, तर गहु पिकासाठी ३५ लाख ६९ हजार ४०३ रूपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ वाशीम तालुक्यातील एकूण ८३६ शेतकऱ्यांनी चना, तर ५५१ शेतकऱ्यांनी गहु पिकाकरिता राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग घेतला होता़ त्यांना चना पिकाबद्दल ५९ लाख ९९ हजार २६८ रूपये, तर गहु पिकासाठी ७८ लाख ८८ हजार रूपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ या शिवाय कारंजा तालुक्यातील एकूण ५४० शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात या योजनेतंर्गत गव्हाचा विमा उतरविला होता़ त्यांना ७ लाख २९ हजार ७३८ रूपयाचा विमा मंजूर झाला आहे़ दरम्यान, भारतीय कृषि विमा कंपनीकडुन एकत्रित नुकसान भरपाईची रक्कम संबंधीत बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. संबंधित बँकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली असल्याची माहिती मिळाली आहे़