शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वाशिम जिल्ह्यात १.११ लाख हेक्टरवर रब्बी पिकाचे नियोजन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:31 PM

आॅफलाईन पद्धतीने खत विक्री झाल्यास संबंधित कृषी सेवा केंद्राविरूद्ध कारवाईचा इशाराही कृषी विभागाने दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रब्बी हंगाम तोंडावर आला असून, कृषी विभागाने १.११ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान बियाणे, खतांची टंचाई भासू नये म्हणून पुरेशा प्रमाणात साठाही उपलब्ध करण्यात येत आहे. आॅफलाईन पद्धतीने खत विक्री झाल्यास संबंधित कृषी सेवा केंद्राविरूद्ध कारवाईचा इशाराही कृषी विभागाने दिला.खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झालेले शेतकऱ्यांची सर्व भीस्त आता रब्बी हंगामातील पिकांवर आहे. दुसरीकडे सिंचनाची सुविधा असणाºया शेतकऱ्यांसमोर अनियमित वीजपुरवठा, नादुरूस्त विद्युत रोहित्रामुळे नवीन संकट उभे ठाकण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविण्यात येत आहे. खरीप हंगामात निसर्गाने यावर्षीही दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरता खचून गेला आहे. शेतमालाच्या उत्पन्नात प्रचंड घट येत असल्याने लागवडी खर्चही वसूल होत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यातील अनेक शेतकºयांवर ओढवली आहे. आता शेतकºयांची सर्व भिस्त रब्बी पिकावर आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार, रब्बी हंगामात एक लाख ११ हजार ९०० हेक्टर क्षेत्रफळावर गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका, सुर्यफुल आदी पिकांची पेरणी होण्याचा अंदाज आहे. सर्वाधिक क्षेत्रफळावर अर्थात ७० हजार हेक्टरवर हरभºयाची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.त्याखालोखाल गहू, रब्बी ज्वारी, करडई, मका आदींचा पेरा राहिल. रासायनिक खतांची टंचाई भासू नये म्हणून जिल्ह्यासाठी ४३ हजार ९५० मे.टन खत मंजूर झाले आहे.यावर्षी जास्त पाऊस झाल्याने रब्बी हंगामात सिंचन होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सिंचनात व्यत्यय नको म्हणून महावितरणने आतापासूनच नादुरूस्त विद्युत रोहित्र बदलून देणे, वीजपुरवठा सलग राहिल याची दक्षता घेणे आवश्यक ठरत आहे.आॅनलाईन पद्धतीने खत विक्री करावी - बंडगरशेतकºयांची कोणत्याही प्रकारे गैरसोय, फसवणूक होऊ नये म्हणून कृषी सेवा केंद्र संचालकांनी रासायनिक खताची विक्री ही ई-पॉस मशिनवरून करावी. आॅफलाईन पद्धतीने खताची विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आॅफलाईन पद्धतीने खताची विक्री केल्यास संबंधितांविरूद्ध योग्य ती कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी व्ही.एस. बंडगर यांनी दिला.रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले असून १.११ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे.खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने शेतकºयांची गैरसोय टळेल.- व्ही.एस. बंडगरकृषी विकास अधिकारी वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती