लोकमत प्रेरणावाटलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: येथून जवळच असलेल्या चेतन सेवांकुर या नेत्रहीन मुलांच्या ग्रुपने आपल्या सारख्याच नेत्रहीन विद्यार्थ्यांना रविवारी रेडिओचे वाटप केले. केकतउमरा येथे चेतन उचितकर या चिमुकल्याच्या चांद्रमौळी झो पडीत आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला ये थील जिजाऊ फाउंडेशनचे संस्थापक अरुण राऊत होते. डॉ. दी पक ढोके, जितेंद्र गोधा, प्रकाशचंद्र गोधा, दिलीप केसवाणी, श्याम नेनवाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राऊत यांनी चेतन सेवांकुरच्या उपक्रमाची स्तुती केली. डॉ. ढोके यांनीसुद्धा चेतन उचित या चिमुकल्याच्या चेतन सेवांकर ग्रुपला आवश्यक सेवा पुरविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी गोधा यांनी झोपडी परिसरात प्लेविंग ब्लॉक बसवून दिल्याबद्दल तसेच मुरूम टाकून रस्ता तयार करून दिल्याबद्दल त्यांचा आणि प्रकाशचंद्र गोधा यांचा सत्कार करण्यात आला. दिलीप केसवाणी व श्याम केसवाणी यांनी नेत्रहीन मुलांसाठी फराळाचे पाकीट व त्यांना प्रवासभत्ता दिला. यावेळी अमरावती, नांदेड, अकोला, वाशिम, आदी ठिकाणच्या ३0 नेत्रहीन विद्यार्थ्यांना चेतन सेवांकुरच्या वतीने रेडिओचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग उचितकर, गंगासागर उचि तकर, चेतना उचितकर, चेतन सेवांकुरच्या सदस्यांनी परिo्रम घे तले. संचालन नेत्रहीन गौरव मालस याने केले, तर आभार प्रदर्शन चेतन उचितकरने केले.
केकतउमरा येथे नेत्रहीन विद्यार्थ्यांना रेडिओ वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:44 AM
वाशिम: येथून जवळच असलेल्या चेतन सेवांकुर या नेत्रहीन मुलांच्या ग्रुपने आपल्या सारख्याच नेत्रहीन विद्यार्थ्यांना रविवारी रेडिओचे वाटप केले.
ठळक मुद्दे ‘चेतन सेवांकुर’चा प्रेरणादायी उपक्रमजागतिक पांढरी काठी दिन साजरा