लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम शहरात आॅनलाईन जुगाराचा (चक्री) अवैध धंदा चांगलाच फोफावल्याची माहिती पोलीसांना प्राप्त होताच रिसोड नाक्यावर सुरू असलेल्या एका आॅनलाईन जुगारावर छापा टाकला. या छाप्यामध्ये संगणकासह ४८ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला असुन दोघांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना २४ नोव्हेंबरला दुपारचे सुमारास घडली. शहरातील रिसोड नाका परिसरात असलेल्या एका बियर शॉपीच्या वरच्या मजल्यावर संगणकावर आॅनलाईन जुगार (चक्री) पैशाने हारजीत करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक कपील मस्के, शिवाजी चौकीचे जमादार नितिन काळे, सतिष गुडदे, विष्णु भोंडे, धनंजय अरखराव, अमोल गिºहे यांच्या पथकाने संशयीत ठिकाणी छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलीसांना आॅनलाईन जुगार सुरू असल्याचे आढळून आले. जुगार खेळणारे राहुल दिलीप राऊत (रा. भिमनगर, वाशिम) व नितिन अर्जुना लोखंडे (रा. काळे फैल, वाशिम) यांना ताब्यात घेतले. पोलीसांनी तिन संगणक, प्रिन्टर, दोन सीपीयू, २ माऊस, लोखंडी टेबल, रोख ८ हजार ९१६ रूपये व ईतर साहित्य असा एकुण ४८ हजार १५६ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये जमादार नितिन काळे यांनी फिर्याद नोंदविली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
वाशिम शहरातील ‘आॅनलाईन’ चक्रीवर छापा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:02 PM
वाशिम शहरात आॅनलाईन जुगाराचा (चक्री) अवैध धंदा चांगलाच फोफावल्याची माहिती पोलीसांना प्राप्त होताच रिसोड नाक्यावर सुरू असलेल्या एका आॅनलाईन जुगारावर छापा टाकला.
ठळक मुद्देसंगणाकासह ४८ हजाराचा ऐवज जप्तदोघांविरूध्द गुन्हे दाखल