कामाला लवकरच सुरूवात होणार : भावना गवळी यांची माहितीरिसोड : गत कित्येक वर्षांपासून रखडलेल्या वाशिम येथील पुसद रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाचा प्रश्न निकाली निघाला असून, कामाला लवकरच सुरूवात होणार आहे, अशी माहिती खासदार भावना गवळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे बुधवारी दिली.वाशिम शहरामधून जाणाऱ्या पुसद मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग गेट क्र. ११४ मुळे सतत वाहतुक कोंडी होते. या त्रासामुळे शहरवासी आणि या मार्गस्थ येणारे , जाणारे प्रवाशी वैतागून गेले आहेत. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी त्या ठिकाणी उड्डानपूल बांधणे आवश्यक आहे ही बाब खासदार भावना गवळी यांनी लावून धरली आणि केंद्र शासनाकडे सतत पाठपुरावा करून केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत पुसद रेल्वे गेट क्रॉसिंग गेट क्रमांक ११४ व हिंगोली रेल्वे गेट क्रॉसिंग गेट क्रमांक ११५ वरील उड्डाण पूल मंजुर करून घेतले होते. त्यापैकी पुसद रेल्वे क्रॉसींगवरील उड्डाण पुलाचे काम सा.बां.विभाग वाशिम व रेल्वे विभागाकडुन संयुक्तपणे करण्यात येणार आहे. रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, अखिलेश्वर प्रसाद सिन्हा आणि उपमुख्य अभियंता रजनीश सरोज यांच्याकडे ााठपुरावा करुन रेल्वेचे मुख्य अभियंता, सिकंदराबाद यांच्याकडुन अंतीम आराखडा मंजूर करुन घेतला आहे्न, असे खासदार गवळी यांनी म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन करण्यात येणाऱ्या कामाच्या निविदा मंजूर झाल्या असुन उड्डाण पुलाच्या कामाचा कार्यारंभ आदेश झालेला आहे. या सोबतच हिंगोली रेल्वे गेट क्रासींग, गेट क्रमांक ११५ वरील उड्डाण पुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडुन करण्यात येणार आहे. सदरच्या कामाचा आराखडा मंजूर झालेला असून या पुलाच्या कामाची प्रत्यक्षात सुरुवात होण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार भावना गवळी यांनी सांगितले. वाहतूक कोंडीतून सुटका होणारपुसद रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंग येथे उड्डाण पुल नसल्यामुळे सध्या वाहतुकीची कोंडी होत आहे. येथे उड्डाणपुल असावा, अशी जिल्हावासी व वाहनधारकांची मागणी होती. आता उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात होणार असल्याने
पुसद मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न निकाली!
By admin | Published: April 27, 2017 12:33 AM