लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयात १० जून सायंकाळी ६ ते ११ जूनला सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १७.३७ मीमी पावसाची नोंद झाली असून, ११ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास धो-धो पाऊस झाला. यामुळे पेरणीला सुरूवात होण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.१० जून रोजी जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झाला. १० जूनच्या रात्रीदेखील वाशिमसह मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड, मानोरा तालुक्यात बºयापैकी पाऊस झाला. सकाळी ८ वाजेपर्यंत वाशिम तालुक्यात १८.८० मीमी पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस मालेगाव तालुक्यात २७.५९ मीमी तर सर्वात कमी पाऊस मानोरा तालुक्यात केवळ ६ मीमी झाला. ११ जून रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वाशिम, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, रिसोड तालुक्यात धो-धो पाऊस झाला. मालेगाव तालुक्यातील छोटेमोठे नदीनाले वाहते झाले. वाशिम शहरासह ग्रामीण भागातही धुवॉधार पाऊस झाला. विजांचा कडकडाट आणि वादळवाºयासह पाऊस झाला असून, मालेगाव , मंगरूळपीर, वाशिम तालुक्यात पेरणी करण्याच्या तयारीत शेतकरी असल्याचे दिसू येते.
वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; बळीराजा सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:42 AM