लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: २७ जून रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने पिकांना संजिवणी मिळाली. गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०.०९ मिमी पाऊस झाला. दरम्यान, दमदार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.गत १६ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते. गुरूवार, २५ जून रोजीच्या रात्री जिल्ह्यात बºयापैकी पाऊस झाला. त्यानंतर २७ जून रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जवळपास २० ते २५ मिनिटे पाऊस झाला. यामुळे पिकांना संजिवणी मिळाली असून, शेतकºयांनाही दिलासा मिळाला. जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्क्यावर पेरणी आटोपली आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे उगवले नाही तर काही ठिकाणी बिजांकूर कोमेजून जात होते. २५ जूनच्या रात्रीनंतर २७ जूनला सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला. यामुळे पिकांना संजिवणी मिळाली आहे. या पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला.
वाशिम जिल्ह्यात सर्वत्र पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 11:31 AM