मंगरुळपीर (जि. वाशिम): गत काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने शेतकर्यांची चिंता अधिकच वाढविली आहे. पावसाअभावी मंगरुळपीर तालुक्यातील पिके सुकत चालली आहे. यावर्षी मृग नक्षत्रातच पावसाचे दमदार आगमन झाल्याने मंगरुळपीर तालुक्यात जवळपास ९५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. मंगरुळपीर तालुक्यात ज्वारी ७१६0, तूर ६0३0, मूग ५२७0, उडीद ५२१0, सोयाबीन २५ हजार ६00, कपाशी १२ हजार ९0 हेक्टर असे पीक पेरणीचे नियोजन आहे. गत तीन वर्षांंंपासून निसर्गाच्या लहरीपणाची शिकार तालुक्यातील शेतकरी ठरला आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ असल्याने शेतकर्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. यावर्षी मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या आशा उंचाविल्या आहेत. दमदार पावसाची प्रतीक्षा न करता शेतकर्यांनी जवळपास ९५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत; मात्र गत पाच-सहा दिवसांपासून पाऊस नसल्याने पिके सुकत चालली आहेत. परिणामी शेतकर्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
पाऊस फितूर; शेतकरी चिंतातुर
By admin | Published: July 06, 2015 2:13 AM